मुंबई : फेरीवाल्यांसाठी स्वनिधी एचडीएफसी बँकेची योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : फेरीवाल्यांसाठी स्वनिधी एचडीएफसी बँकेची योजना

मुंबई : रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठी आत्मनिर्भर निधी उर्फ पंतप्रधान स्वनिधी योजनेनुसार दहा हजार रुपयांपर्यंतचे कमी व्याजदराचे सुलभ कर्ज देण्याची योजना एचडीएफसी बँकेने जाहीर केली आहे.

केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजनेनुसारची ही योजना आहे. त्यानुसार पंतप्रधान स्वनिधी योजनेचा फायदा ग्रामीण भागातील छोट्या उद्योजकांना मिळावा याची काळजी एचडीएफसी बँक घेईल. त्यासाठी या उद्योजकांना डिजिटल सेवा पोर्टल वर नोंदणी करून हे कर्ज ऑनलाईन पद्धतीनेच मिळवता येईल. सध्या देशात पन्नास लाखांच्या आसपास रस्त्यांवरील विक्रेते असल्याचा अंदाज बँकेने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना!

सात टक्के व्याजदराच्या या कर्जासाठी तारण लागणार नाही. त्यासाठी अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार क्रमांकाशी जोडलेला असावा. या पोर्टलवर अर्जदाराने आपली पात्रता तपासून घ्यावी, असेही बँकेने कळविले आहे. या योजनेमुळे विक्रेत्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरु करता येईल व त्याद्वारे उद्योगचक्राला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे बँकेच्या स्मिता भगत यांनी सांगितले.

loading image
go to top