Mumbai : "मुंबईत बॉम्ब ठेवलाय"; माहिती देणाऱ्यालाच पोलिसांनी केली अटक, काय घडलं?

२६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेप्रती विशेष सतर्कता बाळगली जात आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSakal

मुंबईतल्या ताज हॉटेलसह काही परिसरात झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुरक्षेची अधिक काळजी घेतली जाते. अशातच काल मुंबईत बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने खळबळ माजली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी माहिती देणाऱ्यालाच अटक केली आहे.

Mumbai Police
Mumbai Crime : तलवारीने कापले २१ केक; मुंबईत तरूणावर गुन्हा दाखल

'साम'च्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिनेश सुतार या सांगलीतल्या तरुणाने काल रात्री मुख्य नियंत्रण कक्षाला फोन केला आणि झवेरी बाजार भागात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. मात्र ही माहिती खोटी असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Mumbai Police
Mumbai : वाहतूक कोंडीत मुंबईचा जगात तिसरा क्रमांक; १२१ तास जातात वाया

हा तरुण सांगलीतला असून रविवारी रात्री त्याने मुख्य नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर हा फोन केला होता. या तरुणाने दारुच्या नशेत हा फोन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. याप्रकरण लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com