

Summary
घाटकोपर–विक्रोळी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई–ठाणे लोकल सेवा ठप्प झाली.
सकाळच्या गर्दीत लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
चाकरमान्यांना वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले.
मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई ठाणे लोकलसेवा सकाळीच खोळंबली यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी असते मात्र लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मात्र काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.