मुंबई : महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू ; नऊ प्रवाशी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : महामार्गावर भीषण अपघातात तिघांचा मृत्यू नऊ प्रवाशी जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या इको कारला मुंबई अहमदाबाद महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत रविवारी (ता.21) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.अपघातात चालकासह तीन जण ठार झाले आहेत.तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कारने कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला होता.अपघातात हेमंत तरे (वय.60),सुषमा आरेकर (वय.32)चालक राकेश तमोरे (वय.42) यांचा मृत्यू झाला आहे. इको कार मधील प्रवाशी पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी आहेत.मृतात एका महिलेचा समावेश आहे जखमींना महामार्गावरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मृत्यू वाढले

महामार्गावर रविवारी सायंकाळी आवंढाणी गावच्या हद्दीत सती माता हॉटेल समोर गुजरात मार्गिकेवरील भरधाव इको कार MH48CC2252 चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागच्या बाजूने धडल्याने अपघात झाला होता. अपघातात चालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.पालघर तालुक्यातील दांडी गावचे रहिवासी होते.रविवारी सकाळी एकविरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळा येथे गेले होते.परतीच्या मार्गावर असताना हा अपघात झाला.जखमींना उपचारासाठी महामार्गावरील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त इको कार मध्ये बारा प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

loading image
go to top