

BMC Schedules Major Water Supply Shutdown in Mumbai for Infrastructure Upgrade
ESakal
मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बीएमसीने माहिती दिली आहे की, २४०० मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीच्या कामानिमित्त अंशतः शटडाउन होणार आहे. यासाठी, मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के साऊथ आणि संपूर्ण एच ईस्ट वॉर्डमधील पाणीपुरवठा बाधित होईल.