
Mumbai News: प्रदूषणात वाढ झाल्याने आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भायखळा परिसरातील बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. वाढते प्रदूषण रोखण्याबाबत महापालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली आहेत. जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत बांधकाम प्रकल्पांवरील केलेले निर्बंध कायम राहतील, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
भायखळा आणि बोरिवली तेथील बांधकामे सरसकटपणे पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. बांधकामे थांबविल्यानंतर प्रत्यक्ष त्या क्षेत्रात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भायखळा येथील बांधकाम प्रकल्पांना आज अचानक भेट देत त्या ठिकाणचा आढावा घेतला.