
18 Month Old Dies After Ambulance Stuck in Traffic for 5 Hours on Mumbai Ahmedabad Highway
Esakal
वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यानं दीड वर्षांच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा इथं घडलीय. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीत तब्बल पाच तासांपेक्षा जास्त वेळ रुग्णवाहिका अडकली होती. यामुळे दीड वर्षांच्या मुलाने उपचाराअभावी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेतला. रियान असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.