

Woman Confronts Minister Girish Mahajan Over Mumbai Traffic Chaos in Viral Video
esakal
मुंबई : वरळी परिसरात झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर एका महिलेने राज्याचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारल्याची घटना सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि ‘व्हीआयपी संस्कृती’वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.