मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर; बीकॉमसह 20 परीक्षांचा समावेश

तेजस वाघमारे
Friday, 23 October 2020

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील अंतिम वर्ष, सत्राच्या बॅकलॉग आणि नियमित परीक्षा 25 सप्टेंबर पासून सुरू झाल्या होत्या.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आणि बॅकलॉगच्या 20 परीक्षांचे निकाल शुक्रवारी (ता.23) जाहीर करण्यात आले. यामध्ये तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 (सीबीसीएस) चा निकाल 94.36 टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण 22 हजार 653 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 25 हजार 682 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 24 हजार 507 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. 

खडसेंच्या प्रवेशाआधी राजकीय घडामोडी, जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील अंतिम वर्ष, सत्राच्या बॅकलॉग आणि नियमित परीक्षा 25 सप्टेंबर पासून सुरू झाल्या होत्या. या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन विद्यापीठाने यशस्वीपणे केले. या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी विद्यापीठाने 20 परीक्षांचे निकाल जाहीर केले. 

मुंबई पोलिस दलाची व पोलिस आयुक्ताची बदनामी केल्याप्रकरणी रिपब्लिकच्या वार्ताहर व अँकरवर गुन्हा

यामध्ये बीकॉम अकॉंऊन्ट ऍन्ड फायनान्स सत्र 6 (सीबीएसजीएस) आणि नॉन सीबीएसजीएस, बीकॉम अकॉंऊन्ट ऍन्ड फायनान्स सत्र 5 (सीबीएसजीएस) आणि नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बॅंकिंग ऍन्ड इन्श्‍युरन्स सत्र 6 (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बॅंकिंग ऍन्ड इन्श्‍युअरन्स सत्र 5 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (चॉईस बेस्ड), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 6 (सीबीसीएस), बीफार्म सत्र 8 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (सीबीएसजीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75 :25), बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75:25), टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 5(चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), बीएस्सी एव्हिएशन सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीकॉम/बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट अँड इकोनॉमिक्‍स सत्र 5 (चॉईस बेस्ड), आणि बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र 5 (सीबीसीएस), तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्‍चर टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे. हे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

----
संपादन : ऋषिराज तायडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai university declares result of twenty final year exams conducted in last month