
मुंबई : मुंबई आणि परिसरातील अन्य भाषिकांना मराठीचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागात या वर्षीच्या संवादात्मक मराठी अभ्यासक्रमाचे स्तर १चे वर्ग सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू असून, रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत एक वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला जाईल.