Sakal Impact : मुंबई विद्यापीठातील पदभरतीची होणार चौकशी

मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव व सहायक उपकुलसचिव पदांच्या पदभरती घोटाळ्याची आता नव्याने चौकशी होणार आहे.
Mumbai University
Mumbai Universitysakal

मुंबई - मुंबई विद्यापीठातील उपकुलसचिव व सहायक उपकुलसचिव पदांच्या पदभरती घोटाळ्याची आता नव्याने चौकशी होणार आहे. यासाठी माजी माजी कुलगुरू आर.एस. माळींच्या अध्यक्षेतखाली समिती तीन जणांनी समिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गठीत केली आहे.

ही समिती पुढील एक महिन्यात विद्यापीठातील पदभरती घोटाळ्यात सामील असलेल्या तसेच नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक उमेदवारांची व्यक्तीश: चौकशी करून आपला अहवाल एका महिन्यात सरकारला सादर करणार आहे.

डाटा इंट्री ऑपरेटरपासून ते फार्मासीसारख्या खाजगी कंपन्यातील अनुभव तसेच खाजगी शिक्षक पदांची अर्हता असताना त्याची शहनिशा न करता विद्यापीठ प्रशासनाने या बेकायदेशीरपणे नियुक्त्या केल्या होत्या. त्यापैकी २३ हून अधिक जणांच्या चौकशीत त्यांच्या पदांसाठी योग्य पात्रता नसताना त्यांना उपकुलसचिव, सहायक कुलसचिव आदी पदांवर नियुक्त करण्यात आल्याचे संचालकांनी केलेल्या चौकशीत समोर आले होते.

मात्र ही चौकशीच विभागाकडून दडवून ठेवण्यात आली होती. याच घोटाळ्यातील दोन सदस्य आता दोन विद्यापीठात कुलसचिव पदापर्यंत पोहोचले असून त्यातील एकाच राज्यपाल कार्यालयाने गंभीर दखल घेतली होती.

'सकाळ' मधून या पदभरतीवर वृत्तमालिका चालवून हा घोटाळा उजेडात आणला होता. त्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्या घोषणेला तब्बल नऊ महिने उलटल्यानंतर आता या पदभरती घोटाळ्यासंदर्भातील चौकशीसाठी माजी कुलगुरू आर.एस. माळींच्या यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

यात माजी प्र-कुलगुरू एन.एस. उमराणी हे सदस्य तर पुणे सहसंचालक डॉ. किरण बोंदर हे सदस्य सचिव आहेत. बोंदर यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप झालेले असल्याने त्यांच्यावर येत्या काळात विविध संघटनांकडून आक्षेप घेतले जाण्याची शक्यता आहे.

संचालकांच्या चौकशीचे काय झाले

मुंबई विद्यापीठातील पदभरतीतील घोटाळ्यासंदर्भात २०२१ मध्ये उच्च शिक्षण संचालकांनी समिती गठीत केली होती. त्या समितीपुढे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. बहुतांश पदभरतीत प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आली होती.

त्यानंतर हा अहवाल विभागाकडे सादर करण्यात आला, तो अहवालच विभागाने दडपून ठेवला आहे. त्यामुळे संचालकांने सादर केलेल्या समितीच्या अहवालावर अजून चौकशी का करण्यात आली नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

समितीच्या कार्यकक्षा

मुंबई विद्यापीठातील २००९ ते २०१३ या कालावधील उपकुलसचिव, सहायक कुलसचिव यांच्या पदभरतीतील घोटाळ्याची समिती व्यक्तीनिहाय सखोल चौकशी करेल.

- या भरती प्रक्रियेत विहित प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी व्यक्तीनिहाय स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करेल.

- प्रत्येककांची आवश्यक शैक्षणिक अनुभव, वयोमर्यादा, अर्हता तपासून घेईल.

- पदभरतीतील नियुक्ती वैध होती काय, त्यातील अनियमितता,

- पदभरतीतील सामील आणि जबाबदार असलेले अधिकारी यांची भूमिकाही तपासली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com