मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

डॉ. अजय देशमुख यांनी 24 जानेवारी 2019 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख (वय 54) यांचे विद्यानगरी येथील राहत्या घरी आज (ता.2) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने उच्च शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

डॉ. अजय देशमुख यांनी 24 जानेवारी 2019 रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते संचालक महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ या पदावर कार्यरत होते. 

नियतीची अशीही परीक्षा; आई कस्तुरबा रुग्णालयात तर बाळ ऑपरेशन थिएटरमध्ये...

डॉ. अजय देशमुख यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजी या विषयात पूर्ण केले होते. तर त्यांनी पीएचडीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. मुंबईतील सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर उद्या अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai university registrar dr. ajay deshmukh passed away amid cancer infection