
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवे उभारणी कामे प्रगतिपथावर असून ती येत्या दोन दिवसात पूर्ण होत आहेत.