Mumbai Fire: विलेपार्लेत काळरात्र! 11व्या मजल्यावरील आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह मोलकरणीचा मृत्यू

Vile Parle Building Fire Kills Toddler and Maid, Four Injured: मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथे शांता भवन इमारतीच्या 11व्या मजल्यावर भीषण आग; अडीच वर्षांच्या अबीरसह 23 वर्षीय अंकिताचा मृत्यू, चौघांवर उपचार.
Vile Parle Building Fire

mumbai fire

esakal

Updated on: 

Mumbai Vile Parle Building Fire: मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम परिसरात मंगळवारी रात्री बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह 23 वर्षीय मोलकरणीचा मृत्यू झाला. सेंट झेवियर्स स्कूलजवळील ‘शांता भवन’ या इमारतीत रात्री सुमारे 10 वाजून 2 मिनिटांनी आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com