Vimlesh Kumar Audichya Death Case : पोलीस चौकशीत पत्नीचा दावा, आत्महत्येचे कारण उघड

उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या पर्यटन विभागात कार्यरत उपसंचालकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी टिळकनगर परिसरात घडली आहे.
suicide
suicidesakal
Summary

उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या पर्यटन विभागात कार्यरत उपसंचालकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी टिळकनगर परिसरात घडली आहे.

मुंबई - उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या पर्यटन विभागात कार्यरत उपसंचालकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी टिळकनगर परिसरात घडली आहे. डीडी विमलेश कुमार औदिच्य असे मृत उच्च पदस्थ अधिकाऱ्याचे नाव आहे.

मुंबईत टिळकनगर येथील राहत्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून डीडी विमलेश कुमार औदिच्य उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास मृत औदिच्च यांनी दुसऱ्या माळ्यावरून उडी मारल्याने त्यांना जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.

घटनेबाबत त्यांची पत्नी रमा औदित्या यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. कामाचा ताण तसेच घरापासून दूर राहावे लागत असल्याने त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली. परंतु यावर्षी त्यांना 31 मार्चपर्यंत काम करण्यास उत्तर प्रदेश पर्यटन विभागातर्फे सांगण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशी वरून त्याच्या पत्नीची तक्रार नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस अधिक चौकशी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com