

Mumbai Banganga Maha Aarti
Esakal
मुंबई : मुंबईतील वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावाच्या काठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी (ता. ५) सायंकाळी भव्य आध्यात्मिक मेळावा होणार आहे. याठिकाणी जीएसबी टेम्पल ट्रस्टकडून बाणगंगा महाआरती आयोजित केली जाणार आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित केला जाणाऱ्या या महाआरतीला मोठी गर्दी जमत असून यंदाही भाविकांची मोठी मांदियाळी होणार असल्याचा अंदाज आहे.