

Shinde and Thackeray shivsena dispute in Mumbai
ESakal
मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे महापालिकेवर आपलीच सत्ता निर्माण करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडत आहे. मात्र या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप–प्रत्यारोप आणि हिंसक घटना घडत असल्याचे समोर येत आहे.