
Summary
मुंबईत ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान सलग तीन दिवस पाणी कपात होणार.
पिसे व पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील 100 किलोव्हॅट विद्युत केंद्रातील मीटर अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
दररोज दुपारी १२:३० ते ३:०० या वेळेत अडीच तास काम केले जाईल.
मुंबई शहरात तीन दिवस पाणी कपातीचे संकट उद्भवणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ७ ते ९ ऑक्टोबर पर्यंत शहरात पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.