

Tree Collapsed On Haroon Khan Office
ESakal
मुंबईत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यान शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक हारून खान यांच्या घाटकोपर येथील कार्यालयावर एक मोठे झाड कोसळले. झाड उन्मळून पडल्याने कार्यालयाच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले. घटनेच्या वेळी कार्यालयात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच, संबंधित विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी झाड हटवण्यास सुरुवात केली.