esakal | मुंबईसाठी आणखी 300 ICU बेड्सची सोय करणार- BMC

बोलून बातमी शोधा

ventilator bed
मुंबईसाठी आणखी 300 ICU बेड्सची सोय करणार- BMC
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मुंबईत आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाल्याने रुग्णांची चांगलीच गैरसोय झाली. तिसऱ्या लाटेची शक्यता असून त्यावेळी रुग्णांना बेडच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी पालिकेने कंबर कसली. येत्या काही दिवसांत पालिकेने आयसीयू बेड वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत पालिका विविध रुग्णालये आणि कोविड केंद्रांमध्ये ICUच्या 300 खाटांची वाढ करणार आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या बिकट वातावरणात मुंबईकरांसाठी चांगली बातमी

पालिकेने आयसीयू बेडची संख्या वाढवून 2 हजार 906 आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या 1 हजार 491 केली आहे. यानंतरही रुग्णांना ICU बेड घेण्यास अडचणी येत आहेत. हे लक्षात घेता, आता पालिका ICUच्या 300 खाटांची वाढ करणार आहे. येत्या काही दिवसांत विविध रुग्णालयांमध्ये या ICU बेडची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: "योग्य वेळी त्यांचा कार्यक्रम करू"; फडणवीसांचा थेट इशारा

विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये 50, तर नेस्को जंबो कोविड सेंटरमध्ये 50  बेड्स एक ते दोन दिवसात सुरू होणार आहेत. उर्वरित बेड रूग्णांच्या मागणीनुसार इतर कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. शहरात उभारल्या जाणाऱ्या तीन नवीन जंबो कोविड केंद्रांमध्ये आयसीयूच्या 600 हून अधिक बेड्स उपलब्ध असतील.   सुमारे दीड ते दोन महिने हे बेड उपलब्ध होतील.

-अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाण