Mumbai Crime News
esakal
Mumbai cybercrime case exposes rising misuse of social media for women harassment : सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांचा छळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशाच प्रकारे महिलेचे स्नॅपचॅट अकाउंट हॅक करून त्यावरून फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड करत महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट सुरू करून महिलेची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला बोरीवली पोलिसांनी कर्नाटक येथून अटक केली आहे. पवनकुमार धर्मारेड्डी (28 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी देखील याच महिलेची बदनामी केल्याची माहिती आहे.