'त्या' हत्येप्रकरणातले आरोपी तब्बल एक महिन्यानंतर गजाआड

'त्या' हत्येप्रकरणातले आरोपी तब्बल एक महिन्यानंतर गजाआड

मुंबई- काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी एक महिन्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रियकरानं प्रेयसीच्या पतीची हत्या करुन अपघाताचा बनाव करण्यात आला होता. आरोपी प्रियकरासह चौघांना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. प्रियकर नौशाद खान (50) आणि त्याचे साथीदार नूर आलम (38), रामकुमार निर्मल उर्फ देवराज(28), मोहम्मद तकी शेख (28) अशी अटक आरोपींची नाव आहेत. या चौघांवर अहदुल्लाला  खान (38) यांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

गेल्या महिन्यात अहदुल्लाला  खान  बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. तक्रार दाखल करताच पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र मृत अहदुल्लालाच्या भावानं पत्नीचे अनैतिक संबंधाविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केलीय. 

उसने पैसे परत न करण्याच्या वादातून आरोपी प्रियकर नौशादनं अहदुल्लाला जीवे मारण्याचे धमकी दिली असल्याचेही अहदुल्लाच्या भावाने पोलिसांना सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला. त्या दिशेनेच तपास करत चौघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली. या चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपींनी अहदउल्लाची हत्या करुन प्रेयसीच्या साथीनं अपघाताचा बनाव रचल्याचं समजलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नौशादने आपल्या साथीदारांसह अहदुल्लाला नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील निर्जनस्थळी नेलं. हातोड्याने त्याच्या डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून चार चाकी वाहन नेऊन अपघाताचा बनाव केला. 

तुर्भे पोलिस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद देखील आहे. अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या तसेच उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून नौशादने अहदुउल्लाची  हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पोलिसांनी चौघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून  न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

mumbai young man death cause of extra marital affair four accused were arrested

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com