esakal | मुंबईत एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे पाण्याचा टँकर 5 हजार रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

water tanker

मुंबईत एकीकडे पाणीटंचाई तर दुसरीकडे पाण्याचा टँकर 5 हजार रुपये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुसळधार पावसामुळे भांडुप येथील जलउदंचन केंद्रा बंद पडल्याने मुंबईतील बऱ्याच भागातील पाणी पुरवठा बाधित झाला आहे. यानंतर वॉटर टँकर माफिया सक्रिय झाले असून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. एका टँकरसाठी पाच हजार रुपये उकळले जात असून लोकांची लूट सुरू असल्याचे दिसते. (Mumbaikars double Setback Drinking Water Shortage Water Tanker charging high rates)

हेही वाचा: वाढदिवस साजरा करणार नाही; फडणवीसांनंतर अजितदादांचाही निर्णय

पावसाचा मुंबईच्या पाणी पुरवठ्यालाही फटका बसला आहे.भांडूप जलशुध्दीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन यंत्रणे बंद पडली.दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असून पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नाही. याचा सर्वाधिक फटका शहर विभाग आणि पश्‍चिम उपनगरांना बसला असून पुर्व उपनगरातील काही भागालाही फटका बसला आहे.

हेही वाचा: भरती नसताना मिठी नदीला पूर...,'मुंबईसाठी धोक्याचा इशारा'?- आशिष शेलार

मुंबईतील बऱ्याच भागात वॉटर टँकर ने पाणीपुरवठा केला जात आहे. खास करून सांताक्रूझ आणि खार परिसरात वॉटर टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र लोकांची पाण्याची अडचण लक्षात घेऊन प्रत्येक टँकरच्या मागे पाच हजार रुपये उकळले जात असल्याचे वॉच डॉग फाउंडेशन चे ऍड.गॉडफ्राय पिमेंटा यांनी सांगितले.

हेही वाचा: उल्हासनगर: ४ वर्षांचा रूद्र लघुशंकेला गेला अन् पावसाने घात केला

या आधी एका टँकर च्या मागे 2 ते 3 हजार रुपये घेतले जात होते. मात्र मुंबईकरांची पाण्याची निकड लक्षात घेऊन त्यांचे शोषण सुरू असल्याचे ही पिमेंटा यांनी सांगितले. त्यातच घाईघाईत पाणी टँकरने पुरवठा केला जात असल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आजार बळावण्याची भीती देखील व्यक्त केली आहे. याबाबत आपण पालिका आयुक्त इकबालसिंग चहल व पाणी पुरावठा विभागाला कळवले असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे ही गॉडफ्राय पिमेंटा यांनी सांगितले.

loading image