esakal | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांचा अंडी, चिकनवर ताव; मागणी वाढल्याने भाव कडाडले
sakal

बोलून बातमी शोधा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांचा अंडी, चिकनवर ताव; मागणी वाढल्याने भाव कडाडले

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांनी अंड्यासह  चिकनवर ताव मारण्यास सुरूवात केली आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांचा अंडी, चिकनवर ताव; मागणी वाढल्याने भाव कडाडले

sakal_logo
By
मिलिंद तांबे


मुंबई : कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांनी अंड्यासह  चिकनवर ताव मारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या दोन्हीच्या मागणीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला असून गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात ७२ रुपये डझनने भाव असणारी अंडी आता 84 रूपये डझन झाली आहेत. तर चिकनचा भाव 40 रुपयांनी वाढून प्रति किलो 240 रुपये झाला आहे. 

बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर; आंबेडकरी नेत्यांना निमंत्रणच नाही

मुंबईत दररोज 1 हजार टन चिकनचा पुरवठा केला जातो. पूर्वी मुंबईकर साधारणता 800 टन चिकन फस्त करत होते.  गेल्या दोन महिन्यात दिडशे ते दोनशे टनाची मागणी वाढली आहे. तर संपूर्ण राज्यात 1700 ते 1800 टन चिकनचा पुरवठा होत असल्याची माहिती व्हेटर्नीटी इन पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष अजय देशपांडे यांनी दिली. 
कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लोकांचा कल असल्याने मागणी वाढली असल्याचे देशपांडे पुढे म्हणाले. 
जगभरात कोरोना पसरल्यानंतर चिकन तसेच अंड्याबाबत वेगवेगळ्या अफवा परसल्या होत्या. त्याचा परिणाम चिकन आणि अंड्याच्या विक्रीवर झाला होता. फेब्रुवारीत विक्री 50 टक्क्याने घटली होती. त्यानंतर लॉकडाऊनने तर या व्यवसायाचे कंबरडेच मोडले होते. परीणामी पोल्ट्रीपार्म व्यवसायाला साधारणता 500 कोटी रूपयांचा आर्थिक फटका ही बसला होता. मात्र चिकनची मागणी वाढल्याने आता हळूहळू पुन्हा हा व्यवसाय पुर्वपदावर येत असल्याची माहिती ही देशमुख यांनी दिली.
तीन महिन्यांपुर्वी पोल्ट्रीफार्मवर एक कोंबडी 80 रूपये प्रतिकीलो विकली जात होती. त्यात आता 3 रूपयांची वाढ होऊन प्रतिकिलो 83 रूपये झाली आहे. तर किरकोळ बाजारात  चिकन 240 रूपये प्रतिकिलो विकण्यात येत आहे. 

मुंबईला दिवसाला 1 कोटी 80 हजारांच्या वर अंड्यांचा पुरवठा होतो. साधारणता मार्च ते मे च्या दरम्यान अंड्याची मागणी ही घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात अंड्याचा दर प्रति अंडे 5 रूपये इतका खाली आला होता. मात्र आता पुन्हा एकदा अंद्याचा पुरवठा वाढला असून अंड्याची दर ही वाढला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात प्रति अंडे 6 रूपये असणारा दर आता 7 रूपयांवर पोचला आहे. सध्या अंडी 84 रूपये डझन ने विकली जात आहेत.     

एकच नंबर! 101 वर्षीय आजीबाईंचा रुग्णालयात वाढदिवस साजरा; बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून पेरीन इराणीला अनोखी भेट

हॉटेल सुरू झाल्यानंतर मागणी वाढणार
मुंबईत एकूण चिकन पैकी 25 टक्के चिकनचा पुरवठा हा हॉटेलला होत होता. सध्या हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याने हा पुरवठा ही बंद आहे. हॉटेल सुरू झाल्यास चिकनची मागणी 25 टक्के वाढण्याची शक्यता असून दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्यासाठी उत्तम   
वर्क फ्रॉम होम जीवनशैली आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. आरोग्‍यदायी जीवनासाठी उत्तमरित्‍या नियोजित व केंद्रित आणि संतुलित पौष्टिक आहार ही काळाची गरज आहे. शारीरिक व मानसिक आरोग्‍य व्‍यक्‍ती सेवन करत असलेल्‍या अन्‍नावर अवलंबून असते. प्रथिने शरीरातील पेशी, स्‍नायू, त्‍वचा, उती व अवयवांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. चिकन व अंडी सारखे प्रथिनेयुक्‍त अन्‍नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्‍यामध्‍ये कॅलरींचे कमी प्रमाण असण्‍यासोबत प्रथिने संपन्‍न प्रमाणात असतात, असे सुगुणा फूड्सचे कार्यकारी संचालक विग्‍नेश सौंदराराजन यांनी सांगितले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ः)

loading image