

Faster, Safer Mumbai–Pune Journey with New Missing Link Route
sakal
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तब्बल साडेसहा हजार कोटी रुपये खर्चून १३.५ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक उभारला असून, साडेसहा किमीच्या द्रुतगती मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देत पाहणी केली. एक मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.