मुंबईचे एक पाऊल पुढे; गतवर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालात 'अशी' झाली वाढ...

तेजस वाघमारे
Thursday, 16 July 2020

निकालात मुंबई विभागात येणाऱ्या रायगड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 91.28 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल दक्षिण मुंबईचा 86.72 टक्के लागला आहे. 

मुंबई : बारावीच्या निकालामध्ये मुंबई विभागाने यंदा चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मुंबई विभागाच्या निकालात तब्बल 5.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईचा विभागाचा निकाल 89.35 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी 83.85 टक्के निकाल होता. गेल्यावर्षी विभागनिहाय निकालात मुंबई शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होती. यंदा मुंबई मंडळ एक पायरी वर गेले असून शेवटून तिसरे स्थान मिळविले आहे. 

शुल्कासाठी खारघरमधील शाळेचा असाही प्रताप; ऑनलाईन शिक्षणच केले बंद...

निकालात मुंबई विभागात येणाऱ्या रायगड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 91.28 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल दक्षिण मुंबईचा 86.72 टक्के लागला आहे. मुंबई विभागातून बारावी परीक्षा 3 लाख 13 हजार 291 विद्यार्थांनी दिली होती. त्यांपैकी 2 लाख 79 हजार 931 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून 85 हजार 81 विद्यार्थांनी विज्ञान शाखेतून परीक्षा दिली होती. त्यापैकी 80 हजार 964 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेच्या 47 हजार 184 विद्यार्थांपैकी 37 हजार 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

धूमकेतूचे दर्शन होईल का?  खगोलप्रेमींना लागली आहे आस...वाचा सविस्तर

मुंबई विभागातून वाणिज्य शाखेच्या 1 लाख 76 हजार 414 विद्यार्थांनी परीक्षा दिली. यापैकी 1 लाख 56 हजार 794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 4 हजार 612 विद्यार्थांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4 हजार 232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला असून सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे.

अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

मुंबई विभागाचा शाखानिहाय निकाल (टक्केवारी)

  • विज्ञान 95.16
  • कला 80.41
  • वाणिज्य 88.88
  • व्यवसाय अभ्यासक्रम 91.76

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन

4 हजार 644 विद्यार्थी नव्वदीपार
बारावी निकालात यंदा 4.78 टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यभरातील 4 हजार 644 विद्यार्थांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यातील सर्वाधिक विद्यार्थी हे वाणिज्य शाखेतील आहेत.
---
संपादन :  ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbais hsc result better than last year, read full story