
Mumbra Train Incident: मुंब्रा स्थानकाजवळ ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत प्रवाशाचा तोल गेल्यामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीत समोर आला आहे. या घटनेत पाच प्रवासी ठार तर तीन जखमी झाले होते. याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होणार आहे.