
Mumbra Road Accident
ESakal
ठाणे : नुकतेच मीरा भाईंदर येथे डंपरखाली येऊन अपघातात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंब्रा येथे गावदेवी बायपासजवळ बाइक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.