

Mumbai BMC election
ESakal
बापू सुळे
मुंबई : मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात १७०० हून अधिक उमेदवार उतरले असून, त्यात महापौर आणि उपमहापौरपदे भूषवलेल्या सात मातब्बरही रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून चार महापौर, दोन उपमहापौर आणि भाजपकडून एक उपमहापौर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर विरोधकांनी कडवे आव्हान उभे केल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.