

BMC
ESakal
मुंबई : पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुंबई महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. हवामान बदलामुळे वाढलेल्या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या जमिनीत झिरपवणाऱ्या ‘बायोस्वेल’ सुविधांचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महापालिकेने १२,७०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (एनडीएमए) पाठवला असून, त्याचाच महत्त्वपूर्ण भाग म्हणून शहरभर ८०० बायोस्वेल्स उभारण्याची योजना आखली आहे.