
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये, यासाठी कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे.