
नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक, दवाखाने सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. हा ’डोस’ परिणामकारक ठरला असून, आतापर्यंत 1068 नर्सिंग होम सुरू झाली आहेत.
मुंबई : नर्सिंग होम, पॉलिक्लिनिक, दवाखाने सुरू न केल्यास परवाने रद्द करण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला होता. हा ’डोस’ परिणामकारक ठरला असून, आतापर्यंत 1068 नर्सिंग होम सुरू झाली आहेत. चुकार शुश्रूषागृहे व दवाखान्यांवर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई करावी व परवाने रद्द करावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
मोठी बातमी : '८ डिसेंबर 2020 ला संपूर्ण जग होणार COVID19 मुक्त; भारताची तारीख आहे २०...
मुंबईत 1416 नोंदणीकृत शुश्रूषागृहांपैकी (नर्सिंग होम) 1064 आस्थापन सुरू झाल्या आहेत. त्या ठिकाणी प्रामुख्याने हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह अशा दीर्घकालिन आजारांवर उपचार केले जाता. एकूण तर 99 डायलिसिस केंद्रांपैकी 89 केंद्रे सुरू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. नर्सिंग होम, दवाखाने सुरू न करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर साथरोग नियंत्रण कायद्याखाली कारवाई करावी व त्यांचे परवाने रद्द करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. त्यानुसार आता कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मनसे नेते अमित ठाकरेंचा डॉक्टरांसाठी पुढाकार, 1000 पीपीई किट्सचा मार्डला पुरवठा
कोरोना रुग्णांचा रेड झोन असलेल्या धारावीतील दवाखाने सोमवारपासून खुले करण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांनी या दवाखान्यांना आवश्यक साहित्य पुरवले आहे. रुग्णाच्या शरीराचे तापमान मोजूनच दवाखाना अथवा नर्सिंग होममध्ये प्रवेश द्यावा. कोरोनासदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींना महापालिकेच्या दवाखान्यांत अथवा फीवर क्लिनिकमध्ये पाठवावे, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
Municipal 'dose' is effective 75% nursing homes open in Mumbai