

BMC Housing Lottery
ESakal
मुंबई : महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली–२०३४ अंतर्गत प्राप्त ४२६ घरांची संगणकीय सोडत आज (ता. १३) ऑनलाईन पद्धतीने महानगरपालिका मुख्यालयात यशस्वीरित्या पार पडली. या सोडतीत ४२६ घरांपैकी ३७३ अर्जदारांना घरे जाहीर करण्यात आली असून ३६२ अर्जदारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे.