मुंबई : घटस्फोट मागणाऱ्या बायकोचा खून; मुन्ना शहा अखेर गजाआड

पुरावे नष्ट करण्याचा आरोपीनं केला प्रयत्न
culprit arrested
culprit arrestedsakal

मुंबई : बायको घटस्फोटासाठी (husband-wife divorce issue) मागे लागली होती म्हणून भरदिवसा तिच्यावर चाकूनं वार करुन पळालेल्या अब्दुल कलाम उर्फ मुन्ना शहा (Munna shaha arrested) याला मेघवाडी पोलिसांनी (Meghwadi police) अखेर अट केली आहे. 22 डिसेंबरला त्यानं त्याची बायको दिलशाद शाह हिच्यावर चाकुनं वार केले आणि तिथून पळून गेला होता. आजुबाजूच्या नागरिकांनी दिलशादला हॉस्पिटलला पोहोचवलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. (Munna shaha arrested by meghwadi police for killing his wife)

culprit arrested
31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद

बायकोवर हल्ला केल्यानंतर पोलीस आपल्याला अटक करतील या भितीनं अटकेपासून वाचण्यासाठी मुन्ना शाहनं पूर्ण सावधगिरी बाळगली. त्याला क्राईम पेट्रोल सारख्या मालीका बघण्याची आवड होती आणि त्या मालीकांमध्ये दाखवतात तशाच पद्धतीनं आपण पोलिसांना सापडू नये याची त्यानं काळजी घेतली होती. त्याचा फोन आणि सीमकार्ड त़्यानं नष्ट करुन टाकलं, जेणेकरुन पोलिसांना त्याचं लोकेशन कळणार नाही.

त्यानंतर प्रवासासाठी त्यानं शहरातले रेल्वे स्टेशन्स किंवा बस स्टँड टाळले कारण त्याला माहित होतं की अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले असतात, त्यामुळं तो ट्रेन किंवा बसनं ग्रामिण भागात उतरत असे. अशा पद्धतीनं बाराबंकीला आम्हाला सापडण्याआधी त्यानं 15 ठिकाणं बदलली अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी दिली.

culprit arrested
कोरोना नियम मोडणारा उल्हासनगरातील चांदणी बार सील

कलामला शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय पिंपळे, मधुसुदन नाईक यांची टीम तयार करण्यात आली. ते उत्तरप्रदेशमध्ये कलामच्या जवळपास 15 नातेवाईकांना भेटले. तेव्हा तो बाराबंकीला येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली. ठरल्याप्रमाणं तो बारबंकीला आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक केली. बाराबंकीहून तो नेपाळला पळून जाणार होता, अशी माहितीही त्यांनी दिली.

दिलशादशी लग्न झाल्यानंतर काही वर्ष सगळं सुरळीत सुरु होतं पण नंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाले. त्यामुळं दिलशाद कलामकडे घटस्फोटाची मागणी करत होती. गेले सहा महिने दोघंही वेगळे रहात होते. त्यामुळं दिलशातचे दुसऱ्या कुणाबरोबर प्रेमसंबंध आहेत असा कलामला संशय येत होता. त्यातुनच त्यानं दिलशादवर हल्ला केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com