संतापजनक : स्वयंपाक न केल्याने बायकोची हत्या! वाचा संपुर्ण घटना

संतापजनक : स्वयंपाक न केल्याने बायकोची हत्या! वाचा संपुर्ण घटना

मुंबई  : जेवण करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण करीत तिची हत्या केल्याची घटना परेल येथे घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी पतीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. 

मृत पत्नीचे नाव सविता अडसूळ (43) असून पोलिसांनी पती अजया अडसूळ (43) याला अटक केली आहे. अजया आणि सविता हे परेल येथील महालक्ष्मी इमारतीत राहतात. त्यांच्याबरोबर अजया याची आईदेखील राहते. गेल्या अनेक दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. अजया हा क्षुल्लक वादातून पत्नी सविता हिला नेहमी मारहाण करीत होता.

शुक्रवारी (ता. 20) रात्रीही या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर सविता हिने जेवण करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या अजयाने तिला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यातच तोल जाऊन सविता भिंतीवर आदळून बेशुद्ध पडली. यामुळे घाबरलेल्या अजयाने तिला केईएम रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांना अजयाने पत्नी स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याची खोटी माहिती दिली. मात्र सविता हिच्या चेहऱ्यावर, तसेच कपाळावर मारहाण केल्याचे व्रण दिसून आल्याने डॉक्‍टरांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

मुलानेच हत्या केल्याची सासूकडून माहिती 
पोलिसांनी केईएम रुग्णालयात जाऊन या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली असता, अजयाने प्रथम सविता स्वच्छतागृहात पाय घसरून पडल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी बारकाईने चौकशी केल्यावर अखेर सविताची हत्या अजयानेच केल्याचे सासूने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अजयाला अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com