'इथे' मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

अलिबाग - अलिबागेत शिवछत्रपती महाराजांची मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली. शहरातील जोगळेकर नाका येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींनी पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी होत छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करत मुस्लिम समाजाच्या मान्यवर मंडळीने सर्वधर्म समभावाची प्रचिती दिली.

मोठी बातमी बोकडाचं हाड आणि कुटुंबात झगडा, कारण वाचाल तर हैराण व्हाल..

अलिबाग चावडी मोहल्ला येथे मुस्लिम समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे मुस्लिम समाजाने स्वागत करुन मावळ्यांना पाणी वाटप केले. यात समाजाचे ज्येष्ठ नेते इम्तियाज पालकर, जामा मस्जिदीचे अध्यक्ष नसिम बुकबाईंडर, मांडवी मोहल्ला मुस्लिम समाज अध्यक्ष फारुक सय्यद, ज्येष्ठ नेते कैसर दणदणे, वसिम साखरकर, सामजवादी पार्टिचे तालुका अध्यक्ष लतिफ घट्टे, शांतता कमिटी सदस्य नवसिन (नौशाद) पटेल, मुस्ताक घट्टे यांच्यासह युवा सदस्य इम्रान फुदेकर, मुबीन पल्लवकर, जाईद बुकबाईंडर उपस्थित होते.

मोठी बातमी जेलमध्ये अजमल कसाबने ऐकली 'अजान' आणि....

शिवजयंती निमित्ताने सकाळपासूनच उत्साही वातावरण होते. तालुक्यात हेमनगर, वेश्वी, झिराड, आगरसुरे, आवास, अलिबागेतील मारुती नाका, महेश टॉकीज परिसर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी शनिवारी शिवसनिकांनी शिवजयंती साजरी केली. शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडे सर्वत्र ऐकू येत होते.

muslim brothers celebrated shivajayanti in alibaug

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muslim brothers celebrated shivajayanti in alibaug