#CAA_NRC विरोधात मुस्लीम समुदायाच्या भावना तिव्र - अस्लम शेख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुंबई - सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीम समुदायाच्या भावना तिव्र आहेत. या दोन कायद्यांना विरोध करण्यासाठी मुस्लीम समाज आज आझाद मैदानावर एकवला होता कॉंग्रेसचे कँबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी या मोर्चाला उपस्थित राहून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला.

आगीच्या घटना टाळण्यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत

मुंबई - सीएए व एनआरसी विरोधात मुस्लीम समुदायाच्या भावना तिव्र आहेत. या दोन कायद्यांना विरोध करण्यासाठी मुस्लीम समाज आज आझाद मैदानावर एकवला होता कॉंग्रेसचे कँबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी या मोर्चाला उपस्थित राहून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला.

आगीच्या घटना टाळण्यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत

यावेळी बोलतांना शेख म्हणाले की, मुलभूत प्रश्नांपासून लोकांचे लक्ष दूसरीकडे वळवण्यासाठी सीएए, एनआरसी सारखे कायदे आणले जात आहेत. आज देशाचा जीडीपी खाली जात आहे. कंपन्या बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे या मुद्द्यांवर सरकारकडे कोणतेही उत्तर नाही म्हणून अशा प्रकारचे कायदे आणले जात आहेत असही शेख माध्यमांशी बोलताना म्हणाले.

आंदोलकांचा सेल्फीचा मुड...

मोदी सरकार नफरत फैलांना बंद करो,शिक्षा और रोजगार देने का काम करो असे म्हणत महिला आणि तरूण वर्ग आझाद मैदानात घोषणा देत होते.तर काही तरूण आंदोलकांची छायाचित्रे टिपण्यात मग्न होती.गर्दी आणि आंदोलकांचे उत्साहाचे वातावरण पाहत काही आंदोलक सेल्फीच्या मुडमध्ये होते आणि त्यांनी कोपऱ्यात उभे राहून सेल्फी काढले देखील, मात्र पोलीसांना केवळ बघ्याच्या भूमिके शिवाय काहीच करता आले नाही. 

महत्वाचे - मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार

 

गर्दीमुळे एसएमटीवर पोलिसांची तारांबळ
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शनिवारी दुपारी रोजच्या पेक्षा अधिक गर्दी दिसू लागल्याने अन्य प्रवासी भांबावून गेले.पोलीस आणि आरपीएफचे जवान गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिटया मारत होते.त्यामुळे मोर्चा किंवा आंदोलन असणार असा अंदाज लावून प्रवासी स्टेशनच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.मात्र त्यांना बाहेर पडतांना जिकीरी करावी लागली.स्वंयसेवक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमले होते पण त्यांचे आंदोलक ऐकत नसल्याने बाचाबाचीचे प्रसंग उदभवले.सीएसएमटीचा सबवे गर्दीने फुलून गेला होता.त्यांच्या गर्दीमुळे दुकानदारांना पथारी लावण्यावर आज बंधने आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim community sentiments against #CAA_NRC - Aslam Sheikh