ज्या App बद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातायत त्या 'Zoom' शी निगडित या ८ गोष्टी जाणून घ्या आणि मगच वापरा

ज्या App बद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातायत त्या 'Zoom' शी निगडित या ८ गोष्टी जाणून घ्या आणि मगच वापरा
Updated on

मुंबई : देशात सगळीकडे लॉक डाऊन सुरु आहे. त्यामुळे लोकांना घरातच बसून राहावं लागतंय. काही लोकं वर्क फ्रॉम होम करत आहेत. Zoom कॉन्फरंसिंगद्वारे अनेक जण दररोज मिटिंग करतात. तसंच काही लोकं सुट्टीच्या काळात आल्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी Zoom या अप्लिकेशनचा वापर करत आहेत.

गेल्या १ महिन्यात तब्बल १ कोटींपेक्षा जास्त लोकांनी Zoom आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलंय. त्यामुळे या  App ची प्रसिद्धी वाढत चालली आहे. मात्र भारतात आता zoom बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. झूमवर होणाऱ्या सर्व सरकारी व्हिडीओ कॉन्फरन्सेस बंद करण्यात आल्या आहेत. झूमच्या माध्यमातून सर्व गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते. त्यामुळे आता या अप्लिकेशनबद्दल काही महत्वाचे मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(१) एकाच वेळी करू शकतात १०० जण व्हिडीओ कॉल....

Zoom वर एकाच वेळी १०० जण व्हिडीओ कॉलवर बोलता येतं. त्यामुळे ही App  व्हिडीओ कॉन्फरंसिंगसाठी आणि शिक्षणासाठी वापरलं जातं.

(२) भारतात Zoom वर होणार नाहीत सरकारी बैठका:

Zoom वर सरकारी कॉन्फरन्सेस रद्द करण्यात आल्या आहेत. झूम अप्लिकेशनवरून महत्वाची सरकारी माहिती चोरी होऊ शकते म्हणून या बैठक रद्द करण्यात आल्या आहेत.

(३) तुमचा मोबाईल होऊ शकतो हॅक:

Zoom हे App एंड टू एंड इन्स्क्रिप्टेड नाहीये. म्हणजेच तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात ते आणि तुम्ही सोडून तिसरा व्यक्तीही तुमचे मेसेज वाचू शकतो, म्हणजेच तुमचं अकाउंट हॅक करू शकतो.

(४) कोण आहेत झूम अप्लिकेशनचे मालक:

झूम App चे मालक अमेरिकेत राहणारे मूळचे चिनी, एरिक युआन हे आहेत. युआन यांनी चीनमधून अमेरिकेत जाऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये कंपनी सुरु केली. ते सध्या झूमचे सीईओ आहेत.

(५) बऱ्याच ठिकाणी झूम अप्लिकेशन आहे बॅन:

फक्त भारतातच नाही तर सिंगापूर आणि जर्मनीमध्येही झूम अप्लिकेशनवर बंदी घालण्यात आली आहे. एका क्लासदरम्यान झूम अप्लिकेशनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

(६) ब्रिटनची कॅबिनेट मीटिंग झाली सोशल मीडियावर अपलोड:

ब्रिटनमध्ये झालेली एक कॅबिनेट मंत्र्यांची बैठक झूम अप्लिकेशनवरून सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यावरून झूम किती जास्त धोकादायाक आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

(७) गेल्या ३ महिन्यात वाढले २० पट यूजर्स:

झूम ऍप्लिकेशन लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात विशेष लोकप्रिय झालंय.  या काळात झूमचे २० पट यूजर्स वाढले आहेत. त्यामुळे झूमच्या मालकाचं उत्पन्न ११२ टक्क्यांनी वाढून ७.५ अरब डॉलरपर्यंत पोहचलं आहे.

(८) असा करा हॅकिंगपासून बचाव:
 
सरकारच्या म्हणण्यानुसार काही गोष्टींचं पालन करून तुम्ही तुमच्या अकाउंटला हॅकिंगपासून वाचवू शकता. त्यासाठी प्रत्येक मिटींगच्या वेळेला तुमचा आयडी आणि पासवर्ड बदला. वेटिंग रूम फीचरचा वापर करा आणि जॉईनला डिसेबल करा. स्क्रीन शेरिंगचं फिचर केवळ मिटिंग बोलावणार म्हणजेच होस्ट जवळ असू द्या. 

must read these crucial think before using controversial zoom application 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com