पत्नीने धर्मांतर केलं होतं, ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टात दिली माहिती | Sameer wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dyandeo wankhede-nawab malik

पत्नीने धर्मांतर केलं होतं, ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टात दिली माहिती

मुंबई: मुंबई NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede)यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev wankhede) यांनी नवाब मलिक (Nawab malik) यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याकडून दररोज आरोप होत असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी 20 पानांचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात (High court) सादर केलंय.

या 20 पानी प्रतिज्ञापत्रात त्यांनी अनेक कागदपत्र दिलीत, ज्यामध्ये त्यांचं नाव ज्ञानदेव असल्याचं सिद्ध होतंय. नवाब मलिक यांनी दावा केल्याप्रमाणे ज्ञानदेव वानखेडे यांचं नाव दाऊद वानखेडे आहे. नवाब मलिक यांनी हायकोर्टात तीन पानांच प्रतिज्ञापत्र सादर केलंय. ज्ञानदेव वानखेडेंनी कोर्टात पत्नीने धर्मांतर केल्याचं सांगितलं.

हेही वाचा: भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली -नवाब मलिक

ज्ञानदेव वानखेडे यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात सांगितलं की, ते "हिंदू महार आहेत आणि त्याची पत्नी झाईदा ही मुस्लिम होती पण त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केलं." लग्नानंतर झाईदा हिंदू धर्मात समाविष्ट झाल्या. ज्ञानदेव वानखेडे यांनी स्वत:च आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळेच्या मार्कलिस्ट, पोलीस सेवेत असतानाचे कागदपत्रांचे इतर पुरावे कोर्टासमोर ठेवले. नवाब मलिक यांनी केलेली सगळी ट्विट्स वानखेडेंच्या वकिलांनी हायकोर्टत वाचून दाखवली.

हेही वाचा: विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

वकील अर्षद शेख हायकोर्टात वानखेडे कुटुंबियांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. एकूण 28 पानी कागदपत्र ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टासमोर ठेवली. नवाब मलिक यांनी दुबईतील हॉटेलमधला म्हणून यास्मिन आणि समीर वानखेडे यांचा जो फोटो ट्विट केला होता तो फोटो दुबईतला नसून मुंबईतल्या एअरपोर्टवरचा आहे. ते ट्विट पूर्णपणे खोटं आहे, असा युक्तीवाद वानखेडे यांच्या वकिलाने केला.

loading image
go to top