

Nagesh Has Been Bedridden For 17 Years After Dahi Handi Accident Saranik Steps In To Support His Expenses
sakal
ठाणे: दहीहंडीच्या थरावर चढताना २००९मध्ये जखमी झालेले नागेश भोईर गेली १७ वर्षे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च पेलणे अशक्य होत असल्याने कुटुंबाने उपचाराकरिता सरकारकडे मदत मागितल्याबाबतचे वृत्त 'सकाळ' ने शनिवारी (ता. ५) प्रसिद्ध केले. यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज नागेशच्या उपचारांचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली.