Fake Job Scam in Mantralaya
esakal
Job Scam: नागपूर आणि इतर जिल्ह्यांतील अनेक बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी ४५ वर्षीय लॉरेन्स हेनरी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याने आणि त्याच्या सहा सहकाऱ्यांनी सरकारी नोकरी देण्याच्या नावावर नागपूरमधील एका तरुणाकडून लाखो रुपये उकळले. विशेष म्हणजे या नोकरीची मुलाखही चक्क मुंबईतील मंत्रालयात झाली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.