

NCP Alliance In Thane
ESakal
ठाणे : पुण्याप्रमाणे ठाणे महापलिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे विरोधक नसल्याचे स्पष्ट करीत ठाणे शहरात पक्ष विस्तारासाठी सर्व पर्यायांचा विचार करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले. ३० तारखेपर्यंत कोणताही प्रस्ताव आल्यास तो पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.