

Nalasopara Lift Collapsed
ESakal
मुंबई : मुंबईतील नालासोपारा येथे एका सात मजली इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामुळे परिसरात नागरिकांमध्ये एकच खळबळ पसरली आहे.