esakal | मोठी बातमी- ऑक्सिजन अभावी नालासोपाऱ्यात एकाच दिवशी १० रुग्णांचा मृत्यू?

बोलून बातमी शोधा

death.jpg

संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा केला आहे.

मोठी बातमी- ऑक्सिजन अभावी नालासोपाऱ्यात एकाच दिवशी १० रुग्णांचा मृत्यू?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नालासोपारा: वसई-विरारमध्ये आज दिवसभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉस्पिटल प्रशासनासह रुग्ंणाचे नातेवाईक हवालदिल झाले होते. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये सात आणि रिद्धीविनायक हॉस्पिटल मध्ये तीन असे १० कोविड रुग्णांचा आज सोमवार दुर्देवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मृत्यू झालेल्यांमध्ये बविआचे माजी नगरसेवक किशन बंडागले यांचा समावेश आहे. हे सर्व मृत्यू ऑक्सिजन मिळाले नसल्यामुळे झाला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. मात्र हॉस्पिटल व पोलिस प्रशासनाने मात्र हे मृत्यू ऑक्सिजनमुळे नाही तर रुग्णाच्या चिंताजनक परिस्थिती मुळे झाले असल्याचे सांगितले आहे. 

मुंबईत १३ ते ३५ वयोगटाला कोरोनाची सर्वाधिक बाधा
 

नालासोपाऱ्यातील रिद्धीविनायक रुग्णालयात आज सकाळी बविआ माजी नगरसेवक किशन बंडागळे यांचा मृत्यू झाल्या नंतर वसई विरार महारनगरापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांनी हा मृत्यू ऑक्सिजन तुटवड्या मुळे झाला असा गंभीर आरोप करणारी ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. या गंभीर परस्थितीवर राज्यमंञी बच्चू कडू यांनी ही आज अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पञव्यवहार करुन, गंभीर परिस्थितीची जाणीव करुन, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत मागणी केली आहे. 

दादर, कुर्ला टर्मिनसवर गर्दी रोखण्यासाठी रेल्वेकडून काटेकोर नियोजन

आज सायंकाळच्या सुमारास विनायक हॉस्पिटलमध्ये सात जणांचा एकामागून एक मृत्यू झाले असल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा केला आहे. तुलिंज पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना घडली नाही. सात जणांच्या मृत्यूबाबत विनायक हॉस्पिटल प्रशासनाने मात्र अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

विनायक हॉस्पिटलमध्ये आज दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला. नातेवाईक संतप्त झाले होते. आम्ही त्यांना शांत केले आहे. यावर कोणी तक्रार दिली तर आम्ही कायदेशीर कारवाही करणार असल्याचे तुलिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले आहे. "आज तीन रुग्णांचा आमच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. पण सर्व रुग्णांचा मृत्यू  ऑक्सिजन अभावी नाही, तर क्रिटिकल परिस्थितीमुळे झाला" असे रिद्धीविनायक हॉस्पिटल व्यवस्थापक सागर वाघ यांनी सांगितले आहे.