Nalasopara youth abused Thackeray brothers
ESakal
मुंबई
Palghar News: रील्स करत ठाकरे बंधूंना शिवीगाळ, कार्यकर्ते आक्रमक, तरुणाला भररस्त्यात अर्धनग्न करून...; नेमकं काय घडलं?
Nalasopara Suraj Rajeshirke News: एका मराठी तरुणाने रील्स बनवत ठाकरे बंधूंबाबत अपशब्द वापरले. यामुळे कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला असून ही घटना समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आली आहे.
बोळिंज : ठाकरे बंधूंबाबत समाजमाध्यमावार अपशब्द काढणाऱ्या एका मराठी तरुणाला मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली. नालासोपारा येथे गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. या मारहाणीची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आली आहे.

