esakal | अमित शहा यांना कोरोनाचा प्रार्दुभाव दिसत नाही का?- काँग्रेस

बोलून बातमी शोधा

Amit Shah

अमित शहा यांना कोरोनाचा प्रार्दुभाव दिसत नाही का?- काँग्रेस

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी रेमडेसिवीरवरुनही होणाऱ्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. नाना पटोले यांनी आपल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं ते वाचूया सविस्तर.फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

हेही वाचा: फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

काय म्हणाले नाना पटोले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सांगितलं की कोरोनाची भीती संपलेली आहे आणि आता भारत कोरोनामुक्त वाटचाल करत आहे. अशी प्रेस नोट केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या खात्यातून रिलीज करण्यात आली. त्यानंतर रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांचं काम संथगतीनं सुरु झालं. त्याचा परिणाम आता आपण पाहत आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

आज मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये मृत्यूचा जो तांडव सुरु झालेला आहे. ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत. त्या राज्यांमध्ये कोरोनाची भीती नाही. कोरोना नाही, असं वक्तव्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी चार दिवसांपूर्वी केलं. अमित शहांच्या या वक्तव्यावर नाना पटोलेंनी आव्हान केलं आहे. नाना पटोले म्हणाले की, आमचं त्यांना आव्हान आहे. केंद्रातलं सरकार बरखास्त करुन देशात निवडणुका लावा. मग देश कोरोनामुक्त होऊन जाईल. अशा पद्धतीचा जावईशोध वारंवार होताना दिसत आहे.

राज्य सरकारनं रेमिडीसिवर खरेदी करण्याबाबतचं टेंडर काढलेलं होतं. जवळपास आठ लाख रेमडेसिवीर राज्य सरकारला पाहिजे होते. त्याच टेंडर काढलं गेलं होतं. दोन कंपन्यांना ते टेंडर मिळालं. दर आठवड्याला जवळपास दर दिवशी ५० हजार रेमडेसिवीर मिळेल असे दोन्ही कंपन्यांनी राज्य सरकारला सांगितलं. दरम्यान आता त्या दोन्ही कंपन्यांनी आता राज्य सरकारला कळवलेलं आहे की, आम्ही तेवढा पुरवठा करु शकणार नाही. या कंपन्यांनी हा आकडा आता हजार पाचशेवर आणलेला आहे, असं पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

या कंपन्या आहेत. ज्या कंपन्यांनी राज्य सरकारची करार केला होता. त्या कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव आहे का?, असा सवाल पटोले यांनी उपस्थित करत महाराष्ट्राला या परिस्थितीत अडकवून रेमिडीसिवर आणि ऑक्सिजनच्या बाबतचं राजकारण करुन राज्यातल्या लोकांचा जीव जो मोठ्या प्रमाणात चालला आहे, असं कृत्य करण्याचं प्रयत्न सुरु आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मानले केंद्र सरकारचे आभार

राहुल गांधींनी स्वतः पश्चिम बंगालमध्ये आम्ही कोणत्याही निवडणुकीचा प्रचार करणार नाही. असं जाहीर केलं. ज्या ठिकाणी गर्दी होते. त्या ठिकाणी कोरोना वाढतो. म्हणून राहुल गांधी यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी यांनीही त्याच पद्धतीचा निर्णय घेतला. पण देशाचे कर्ते जे प्रधानसेवक आजही प्रचाराच्या धुमाळीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

राज्य असो वा केंद्र असो या दोन्ही सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर सारखे जे जनतेचं जीव वाचवत आहे. त्या पुरवले पाहिजेत. यावर कोणतंही राजकारण झालं नाही पाहिजे अशी भूमिका ही काँग्रेसची आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.