आंदोलन कोणाचं माहिती नाही, काँग्रेस रॅलीतील वारकऱ्यांचं भन्नाट उत्तर

mumbai congress protest
mumbai congress protest

मुंबईत काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. सागर नावाच्या फडणवीसांच्या बंगल्याबाहेर हे आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसने स्पष्ट करताच भाजपचे कार्यकर्तेही फडणवीसांच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे मुंबईत काँग्रेस विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचा संघर्ष पाहायला सुरू आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. काँग्रसेच्या आंदोलनाला तोंड देण्यासाठी भाजपने प्रति आंदोलन सुरू केलंय. त्यामुळे वातावरण आणखी गरम झालंय. (Congress Protest in Mumbai)

आंदोलनात नाना पटोलेंना पाठिंबा देण्यासाठी वारकरी आल्याचं दिसलं. त्यांच्यासोबत नाना टाळ आणि मृदंग वाजवत होते. यावेळी उपस्थित लहान वाकरऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी भन्नाट उत्तरं दिली. एबीपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. (Mumbai Congress)

mumbai congress protest
LIVE : PM मोदींनी नाही, काँग्रेसनं देशाची माफी मागावी - फडणवीस

या आंदोलनात महिला आणि काही वारकरी सामील झाले होते. मात्र यातील काहींना आंदोलन का आहे, हे माहिती नव्हतं. यातील काही लहानग्या वारकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांना आंदोलन का आहे, कोणाचं आहे याची माहिती नव्हती. मात्र, मोठ्या उत्साहाने ते टाळ वाजवत सहभागी झाले होते. कोणत्या नेत्यासाठी आंदोलन करत आहोत, असं विचारल्यानंतर त्यांना उत्तर देता आलं नाही. मात्र, ही मुलं कुटुंबीयांसोबत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com