
Four BJP Leaders From Nashik Embarrassed in Mumbai While Seeking Tickets
Esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र येत्या दोन-तीन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. नाशिकमध्ये भाजपनं महापालिका निवडणुकीत शंभर प्लसचा नारा दिलाय. यासाठी भाजपकडून इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचं प्रमाण वाढलंय. तर निष्ठावंतांमध्ये नाराजीही आहे. यातच आता एक असा प्रकार घडला की पक्षाची उमेदवारी मागायला गेलेल्यांवर हकालपट्टीची वेळ आली. नाशिकहून महापालिकेच्या उमेदवारीची मागणी करायला मुंबईत गेलेल्या चार पदाधिकाऱ्यांची मोठी फजिती झालीय. पक्षाकडून जवळपास हकालपट्टी निश्चित झाली असताना केवळ समज देऊन त्यांना माफ करण्यात आलंय. सध्या नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा हा किस्सा राजकीय वर्तुळात रंगला आहे.