Dombivli News : नाशिकच्या जागेसाठी डोंबिवलीच्या भाऊ चौधरी यांचे नाव आता चर्चेत

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विजय करंजकर यांच्यानंतर आता डोंबिवलीचे रहिवाशी व शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे नाव नव्याने चर्चेत आले आहे.
nashik lok sabha constituency bhau choudhary from dombivli politics
nashik lok sabha constituency bhau choudhary from dombivli politicsSakal

डोंबिवली- नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विजय करंजकर यांच्यानंतर आता डोंबिवलीचे रहिवाशी व शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे नाव नव्याने चर्चेत आले आहे.

नाशिकच्या जागेचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी महायुतीत बैठका सुरू आहे. हेमंत गोडसे व छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू असले तरी त्या दोघांविषयी नाराज असल्यामुळे पर्यायी उमेदवाराचा शोध युतीकडून घेतला जात आहे भाजपचे आमदार राहुल ढिकले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे नाव देखील आता पुढे येत आहे.

नाशिक लोकसभेची उमेदवारीचा तिढा अद्याप कायम आहे. सध्याचे शिवसेनेचे खासदर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळेल की नाही ही शाश्वती नसल्याने त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण मध्ये भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यातच अजय बोरस्ते,विजय करंजकर आणि भाऊसाहेब चौधरी या तीन नावांची चर्चा नाशिक लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवारीकरता सुरू झाली आहे.

याबाबत डोंबिवलीचे रहिवासी, शिवसेनेचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्रचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्र एकमेव सीट ही शिवसेनेकडे आहे. या लोकसभेमध्ये शिवसेना सातत्याने निवडणूक लढते या दोन्ही वेळी सेनेचे हेमंत गोडसे हे निवडून आलेत आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

साहजिकच आहे दोन टर्म निवडून आलेले खासदार त्या ठिकाणी पुन्हा इच्छुक असणं आणि उमेदवारी मिळणे स्वाभाविक आहे ते प्रयत्न करत आहेत. नाशिकच्या जागेचा तिढा तिला सुटला पाहिजे आणि एक दोन दिवसांमध्ये नाशिकचा जागेचा प्रश्न मार्गी लागेल.

शिवसेनाच त्या ठिकाणी धनुष्यबाणावर लढेल. नाशिकच्या जागेवर आमच्यासाठी उमेदवार कोण आहे महत्त्वाच नाही. धनुष्यबाण चिन्हावरती लढणं आणि धनुष्यबाण विजय होणे आणि महायुतीला एक खासदार होणं महत्त्वाच आहे.

परंतु आमची प्रामाणिक इच्छा आहे की उत्तर महाराष्ट्रची ही एकमेव जागा शिवसेनेकडे आहे आणि ती शिवसेनेकडेच राहिली पाहिजे. आमची निशाणी धनुष्यबाण आहे.उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही धनुष्यबाण महत्त्वाचा आहे आणि धनुष्यबाण त्या ठिकाणी विजय झाला पाहिजे असे चौधरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com