धक्कादायक प्रकार ! शैक्षणिक दिनदर्शिकेमधून राष्ट्रभाषा 'हिंदी' विषय 'गायब'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

राज्यातील अनेक शैक्षणिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या संदर्भात मेसेज व्हायरल होत आहेत. हिंदी अध्यापक ग्रुप, हिंदी अध्यापक महाराष्ट्र, हिंदी शिक्षक यांसारख्या अनेक हिंदी विषय शिकणार्‍या शिक्षकांनी शैक्षणिक दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

मुंबई : शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी पाठ्यपुस्तकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास सहाय्य करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली. त्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व पालकांच्या मदतीने स्वयंअध्ययन कसे करावे याबाबत माहिती दिली आहे. मात्र या दिनदर्शिकेमधून राष्ट्रभाषा असलेल्या ‘हिंदी’ विषयाला वगळण्यात आल्याने शिक्षकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

BIG NEWS  - पावसाळा आला आजार घेऊन, पावसाळ्यात स्वतःचा आजारांपासून बचाव करण्यासाठीचं संपूर्ण गाईड.. 

कोरोनामुळे शालेय विद्यार्थांना सध्या ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देता यावे, यासाठी पालकांच्या सहाय्याने स्वयंअध्ययन व मार्गदर्शनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विषयनिहाय शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षक आणि पालकांनी जून ते ऑगस्टदरम्यान विषयनिहाय कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा, याचे सविस्तर मार्गदर्शन दिले आहे. ही दिनदर्शिका परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र या दिनदर्शिकेत हिंदी विषयच समाविष्ट नसल्याचे उघडकीस आले आहे.

मोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...

समाज माध्यमांवर चर्चा
राज्यातील अनेक शैक्षणिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर या संदर्भात मेसेज व्हायरल होत आहेत. हिंदी अध्यापक ग्रुप, हिंदी अध्यापक महाराष्ट्र, हिंदी शिक्षक यांसारख्या अनेक हिंदी विषय शिकणार्‍या शिक्षकांनी शैक्षणिक दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा : तब्बल 22 कोटी 70 लाख रुपये खर्चूनही कोरोनाचा नियंत्रणात नाही, मुंबईकर विचारतायत चाललंय काय ?

देशात सर्वाधिक बोलली आणि लिहिली जाणार्‍या हिंदी भाषेच्या विषयाला शैक्षणिक दिनदर्शिकेत स्थान न देणे, हे फारच खेदजनक आहे. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तातडीने शैक्षणिक दिनदर्शिकेची पुनर्रचना करावी.
- उदय नरे, माजी सदस्य, राज्य मंडळ

काय आहे दिनदर्शिकेत ?
पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित नियोजन, अभ्यास व मुल्यमापन यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने निर्माण केलेले हे पुरक साहित्य विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांनाच लॉकडाऊनच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यापूर्वी पीडीफ स्वरूपात असलेल्या या दिनदर्शिकेत गणिते कोणत्या पध्दतीने सोडवायची, उजळणी कशी करायची, पाठ वाचन झाल्यावर कृती पत्रिका सोडवण्यासाठी काय करायचे? या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

National language Hindi subject disappears from academic calendar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National language Hindi subject disappears from academic calendar